Elon Musk: “OpenAI लवकरच Microsoft ला मागे टाकेल” , सॅम ऑल्टमनच्या विधानावर एलॉन मस्क यांचा पलटवार

सॅम ऑल्टमन यांनी संकेत दिले आहेत की OpenAI आता स्वतःचं ‘AI Cloud’ तयार करत आहे. म्हणजेच कंपनी थेट इतर व्यवसायांना आणि व्यक्तींना आपली क्लाउड सेवा विकणार आहे.
Elon Musk: “OpenAI लवकरच Microsoft ला मागे टाकेल” , सॅम ऑल्टमनच्या विधानावर एलॉन मस्क यांचा पलटवार

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा ओपनएआय आणि मायक्रोसॉफ्टवर टीकास्त्र सोडले आहे. चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआयचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांनी नुकत्याच दिलेल्या विधानावर मस्क यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. सॅम ऑल्टमन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “लवकरच एक नवीन प्रकारचं तंत्रज्ञान येणार आहे, जे आज आपण वापरत असलेल्या ऑफिस टूल्स जसे की Google Docs, Slides, ई-मेल आणि Slack यांना पूर्णपणे बदलून टाकेल.” म्हणजेच, त्यांच्या मते भविष्यात हे सध्याचे सर्व प्रॉडक्टिव्हिटी टूल्स अप्रासंगिक होतील. यावर एलॉन मस्क यांनी एक्सवर उत्तर दिलं, “जसं मी आधी सांगितलं होतं, OpenAI आता Microsoft शी थेट स्पर्धा करणार आहे.”

एका वापरकर्त्याने सॅम ऑल्टमनचा व्हिडिओ आणि मस्क यांचं उत्तर एकत्र पोस्ट करताना मस्कचा जुने ट्वीटही पुन्हा शेअर केले आहे, ज्यात मस्क यांनी म्हटलं होतं, “OpenAI लवकरच Microsoft ला मागे टाकेल.” या पोस्टवर मस्क यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आणि लिहिलं, “या टप्प्यावर Microsoft साठी OpenAI ला सपोर्ट करणं म्हणजे आत्मघातकी निर्णय घेणं आहे.” मायक्रोसॉफ्टने 2019 पासून OpenAI मध्ये गुंतवणूक सुरू केली होती. सप्टेंबर 2025 पर्यंत कंपनीने OpenAI मध्ये तब्बल 11.6 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. सध्या मायक्रोसॉफ्टचा OpenAI मध्ये 27 टक्के हिस्सा आहे, ज्याची किंमत अंदाजे 135 अब्ज डॉलर आहे.

हेही वाचा: RBI Sachet Portal: डिजिटल व्यवहारात फसवणूक झाली? घाबरू नका! RBI च्या ‘सचेत’ पोर्टलवर करता येईल तक्रार

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी नुकत्याच झालेल्या अर्निंग कॉलमध्ये सांगितलं होतं की, “मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI यांचं भागीदारीचं नातं हे उद्योगातील सर्वात यशस्वी संबंधांपैकी एक आहे.” तरीही, गेल्या काही महिन्यांत दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढताना दिसते आहे. मायक्रोसॉफ्टने आपले बरेचसे एआय प्रोजेक्ट्स OpenAI च्या मॉडेल्सवर आधारित ठेवले आहेत, पण आता कंपनी स्वतःचा एआय मॉडेल तयार करत आहे. ऑगस्ट महिन्यात मायक्रोसॉफ्टने आपला स्वतःच्या AI मॉडेल चाचणीसाठी उपलब्ध केल्याचं जाहीर केलं, ज्यामुळे त्यांच्या ‘Copilot’ सेवेत सुधारणा करता येईल.

दुसरीकडे, सॅम ऑल्टमन यांनी संकेत दिले आहेत की OpenAI आता स्वतःचं ‘AI Cloud’ तयार करत आहे. म्हणजेच कंपनी थेट इतर व्यवसायांना आणि व्यक्तींना आपली क्लाउड सेवा विकणार आहे. यामुळे OpenAI आता Google Cloud, Microsoft Azure आणि Amazon Web Services (AWS) यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी थेट स्पर्धेत उतरणार आहे. म्हणजेच, पुढील काही महिन्यांत OpenAI आणि Microsoft यांच्यातील नातं ‘भागीदारी’पेक्षा ‘स्पर्धात्मक’ जास्त दिसणार आहे आणि एलॉन मस्क यांच्या विधानांमुळे या तंत्रज्ञान युद्धात नवी रंगत येणार हे निश्चित आहे.

हेही वाचा: IM Motors LS9: 'या' कारमध्ये आहे चक्क गरम पाण्याचा शॉवर! मसाज करून देणाऱ्या सीटसह 5K डिस्प्ले सुद्धा … आणि बरच काही

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version