AI Based Evaluation: विद्यार्थ्यांच्या निकालात आता चुकांना थारा नाही! CBSE कडून ऑन-स्क्रीन मार्किंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

यामुळे मूल्यमापन अधिक अचूक, पारदर्शक आणि जलद होणार असून विद्यार्थ्यांच्या निकालातील चुका कमी होणार आहेत.
AI Based Evaluation: विद्यार्थ्यांच्या निकालात आता चुकांना थारा नाही! CBSE कडून ऑन-स्क्रीन मार्किंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE (Central Board of Secondary Education) आपल्या मूल्यमापन प्रक्रियेत मोठा तांत्रिक बदल करत आहे. मूल्यांकन अधिक अचूक, पारदर्शक आणि जलद करण्यासाठी बोर्डने ऑन-स्क्रीन मार्किंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence, AI) आधारित प्रणालीचा अवलंब केला आहे. आता पारंपरिक पद्धतीने लाल पेनने उत्तरपत्रिका तपासण्याचा काळ मागे पडत असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली आहे.

या नव्या प्रणालीत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून संगणकाच्या स्क्रीनवर परीक्षकांना उपलब्ध करून दिल्या जातात. परीक्षक डिजिटल पद्धतीने गुणांकन करतात, तर बॅकएंडमध्ये सक्रिय असलेली Artificial Intelligence (AI) प्रणाली संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवते. परीक्षक प्रत्येक उत्तराला पुरेसा वेळ देत आहेत का, गुणांकनात विसंगती आहे का, याची सतत तपासणी केली जाते.

सीबीएसई परीक्षा केंद्रांमधून उत्तरपत्रिका थेट प्रादेशिक केंद्रांवर पाठवून उच्च-गती स्कॅनर्सद्वारे डिजिटल स्वरूपात रूपांतरित केल्या जातात. प्रत्येक उत्तरपत्रिकेला एक विशिष्ट बारकोड दिला जातो, ज्यामुळे परीक्षकांना विद्यार्थ्याची ओळख कळत नाही. या ‘ब्लाइंड इव्हॅल्युएशन’ पद्धतीमुळे निष्पक्षता सुनिश्चित होते. त्यानंतर या उत्तरपत्रिका क्लाउड सर्व्हरवर सुरक्षित ठेवल्या जातात.

हेही वाचा: Satish Bhosale Bail: मोठी बातमी! सतिश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर; वर्षभराच्या जेलवारीनंतर मिळाला दिलासा

परीक्षक आता घरून किंवा मूल्यांकन केंद्रातून लॉग-इन करून उत्तरपत्रिका तपासू शकतात. स्क्रीनवर एका बाजूला विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका आणि दुसऱ्या बाजूला अधिकृत मार्किंग स्कीम दिसते. सिस्टीम प्रत्येक प्रश्नाला गुण देईपर्यंत पुढील उत्तरपत्रिका उघडत नाही, त्यामुळे कोणताही प्रश्न तपासायचा राहण्याची शक्यता राहत नाही.

AI प्रणाली सुपरवायझरप्रमाणे काम करते. जर एखादा परीक्षक खूप जलद गतीने उत्तरपत्रिका तपासत असेल तर त्याला अलर्ट दिला जातो. गुणांची बेरीज आपोआप केली जाते, त्यामुळे टोटलिंगमधील चुका पूर्णपणे टळतात. तसेच, एखाद्या विशिष्ट प्रश्नासाठी सर्व विद्यार्थ्यांना कमी किंवा जास्त गुण मिळत असल्यास त्याचा पॅटर्नही ओळखला जातो.

पूर्वीच्या पद्धतीत काही उत्तर तपासले न जाणे किंवा गुणांची चूक होणे यासारख्या समस्या उद्भवत होत्या. मात्र डिजिटल प्रणालीमुळे अशा चुका जवळपास अशक्य झाल्या आहेत. कोणतेही रिकामे कॉलम किंवा तपासणी न झालेला भाग सिस्टीम लगेच दाखवते, त्यामुळे अचूकता वाढली आहे.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहता, हा बदल अत्यंत सकारात्मक आहे. आता निकाल अधिक विश्वासार्ह होणार असून गुणांमध्ये चूक होण्याची भीती कमी झाली आहे. सीबीएसईचा हा उपक्रम भविष्यात पूर्णपणे AI-आधारित स्वयंचलित मूल्यमापनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे. 

हेही वाचा: Registrar Office Raid: 1 कोटी 23 लाखांचे दागिने, 25 लाख रुपयांची रोकड…; उपनिबंधक कार्यालयात कोट्यवधींचा खजिना उघडकीस

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version