iPhone आता होणार ‘सुपर इंटेलिजेंट’! iOS 27 मध्ये नवे AI फीचर्स येणार; पदार्थांकडे कॅमेरा धरताच दिसणार सर्व न्यूट्रिशन व्हॅल्यू

नवीन Siri अधिक चॅटबॉटसारखी काम करेल, अनेक कमांड्स समजू शकेल आणि स्क्रीनवरील माहितीच्या आधारावर उत्तर देऊ शकेल.
iPhone आता होणार ‘सुपर इंटेलिजेंट’! iOS 27 मध्ये नवे AI फीचर्स येणार; पदार्थांकडे कॅमेरा धरताच दिसणार सर्व न्यूट्रिशन व्हॅल्यू

एआयच्या शर्यतीत मागे पडल्याची टीका होत असताना Apple आता iOS 27 मध्ये मोठे एआय अपडेट्स आणण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी किमान चार नवीन एआय टूल्सवर काम करत आहे, जे थेट सिस्टम ॲप्समध्ये काम करतील आणि आयफोनला आजूबाजूचे वातावरण अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत करतील.

iOS 27 मधील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे “व्हिज्युअल इंटेलिजन्स”. या फीचरच्या मदतीने आयफोन केवळ वस्तू ओळखणार नाही, तर त्यासंबंधित माहितीही देईल. उदाहरणार्थ, जर वापरकर्त्याने पदार्थांकडे कॅमेरा केला, तर आयफोन त्या पदार्थातील पोषणमूल्ये सांगू शकेल. तसेच प्रिंटेड फोन नंबर, पत्ते किंवा बिझनेस कार्ड स्कॅन करून ते थेट कॉन्टॅक्ट्समध्ये सेव करता येतील. 

Apple Wallet मध्येही मोठा बदल अपेक्षित आहे. एआयच्या मदतीने फिजिकल तिकीट, जिम कार्ड किंवा इतर पास स्कॅन करून ते डिजिटल स्वरूपात सेव करता येतील. त्यामुळे वापरकर्त्यांना वेगवेगळे कार्ड किंवा तिकीट सोबत ठेवण्याची गरज कमी होईल.

हेही वाचा: Amit Thackeray: पोलिसांना फ्री हँड द्यावा, मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

सर्वात मोठे अपडेट मात्र Siri मध्ये पाहायला मिळू शकते. Apple आता Siri ला पूर्णपणे चॅटबॉटसारखे बनवण्याच्या तयारीत आहे. नवीन Siri एकाच वेळी अनेक कमांड्स समजू शकेल, स्क्रीनवर काय सुरू आहे ते ओळखू शकेल आणि संदर्भानुसार उत्तर देऊ शकेल. वापरकर्ते Siri सोबत टेक्स्ट आणि व्हॉइस दोन्ही माध्यमातून संवाद साधू शकतील.

रिपोर्ट्सनुसार, नवीन Siri मध्ये स्वतंत्र चॅट इंटरफेस, जुने संवाद लक्षात ठेवण्याची क्षमता, फोटो आणि डॉक्युमेंट्सचे विश्लेषण, वेब सर्च आणि इतर एआय चॅटबॉट्ससारखी फीचर्स असतील. भविष्यात Google Gemini, ChatGPT आणि इतर थर्ड पार्टी एआय टूल्ससोबतही Siri चे इंटिग्रेशन वाढवले जाऊ शकते.

Apple च्या जून 2026 मध्ये होणाऱ्या परिषदेत iOS 27 आणि नवीन Siri ची घोषणा करू शकते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नवीन आयफोन सीरिजसोबत हे अपडेट रोलआउट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणूकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी; बाळासाहेब थोरातांसह 'या' नेत्यांनी कसली कंबर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version