Bihar Election 2025: बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील सराईरंजन विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शीतलपट्टी गावाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हजारो व्हीव्हीपॅट (VVPAT) स्लिप्स सापडल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. राष्ट्रीय जनता दलाने (RJD) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, व्हिडिओमध्ये केएसआर कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला फेकलेल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स स्पष्ट दिसत आहेत. या स्लिप्स मतदानानंतर दोन दिवसांनी सापडल्या असून, या मतदारसंघात 6 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोशन कुशवाह आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ तपास सुरू करत सर्व स्लिप्स जप्त केल्या. तसेच उमेदवारांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत समस्तीपूरच्या जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात ही स्लिप्स मॉक पोलिंगदरम्यान वापरलेल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही निष्काळजीपणा झाल्याचे मान्य करून संबंधित एआरओ अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
समस्तीपुर के सरायरंजन विधानसभा क्षेत्र के KSR कॉलेज के पास सड़क पर भारी संख्या में EVM से निकलने वाली VVPAT पर्चियां फेंकी हुई मिली। कब, कैसे, क्यों किसके इशारे पर इन पर्चियों को फेंका गया? क्या चोर आयोग इसका जवाब देगा? क्या यह सब बाहर से आकर बिहार में डेरा डाले लोकतंत्र के… pic.twitter.com/SxOR6dd7Me — Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) November 8, 2025
जिल्हाधिकारी कुशवाह यांनी सांगितले, “सराईरंजन मतदारसंघातील डिस्पॅच सेंटरजवळ काही व्हीव्हीपॅट स्लिप्स सापडल्या. सर्व स्लिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी आणि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.” या घटनेनंतर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विरोधकांनी आयोगाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.