ठाकरे गटाची चिंता वाढली

ठाकरे गटाची चिंता वाढली

नाशिकमध्ये ठाकरे गटाची गळती थांबायचं नाव घेईना, शहरातील जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठे भगदाड पडले आहे. आज मुंबई यथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकार्यांनी मशाल सोडून ढाल आणि तलवार हाती घेतली असून धुमधडाक्यात त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाचं नाशिकमधील बळ वाढलं आहे. यामुळे शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.

आज संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येणार असून पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने त्यांना राऊतांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख यांच्यासोबतच विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे गटाला लागलेली ही गळती आगामी निवडणुकांमध्ये मारक ठरणार आहे.

नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. नाशिकमधूनच ठाकरे गट कमकुवत होत चालला आहे. त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरून नाशिकमध्ये जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून 2 दिवस संजय राऊत नाशिकमध्ये असणार आहेत. त्यामुळे यापुढेही हीच परिस्थिती राहील की ठाकरे आणि राऊत यांचे दौरे नाशिकमध्ये होणारी गळती थांबवण्यात यशस्वी होतील का हे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version