‘सुरुवात मलिकांनी केली, शेवट मी करणार’; फडणवीसांचे मलिकांना प्रत्युत्तर

‘सुरुवात मलिकांनी केली, शेवट मी करणार’; फडणवीसांचे मलिकांना प्रत्युत्तर

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, देवेंद्र फडणवीस यांचा जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरसोबत संबध आहे तसेच फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचा कारभार सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे. मलिकांनी केलेले आरोप म्हणजे लवंगी फटाका त्यामुळे आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. मलिकांनी सुरुवात केली त्याचा शेवट मी करणार, असा इशारा फडणवीसांनी मलिकांना दिला आहे.

  देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवाब मलिक यांचे सबंध अंडरवर्ल्डसोबत आहे. त्यामुळे त्याचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड करणार असून त्याचे पुरावे शरद पवार यांनाही देणार असल्याचे ते म्हणाले. मलिकांनी लवंगी फटाका लावण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मलिकांनी केलेले आरोप म्हणजे लवंगी फटाका असून दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेल. अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेल्या व्यक्तीने माझ्याबाबत आणि ड्रग्जबाबत बोलू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

  नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे जयदीप राणा या ड्रग्ज पेडलसोबतचे फोटो शेअर करत फडणवीस आणि राणा यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप फडणवीसांवर केला आहे. तसेच फडणवीसांच्या इशाऱ्यावर राज्यात ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version