Sonu Sood Is Savior: दुबईत अडकलेल्या हजारो प्रवाशांसाठी सोनू सूद बनला देवदूत; व्हिडिओ शेअर करत म्हणाला ‘ फक्त एक मेसेज…’

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईसह अनेक देशांमध्ये विमानसेवा विस्कळीत झाल्याने हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत.
Sonu Sood Is Savior:  दुबईत अडकलेल्या हजारो प्रवाशांसाठी सोनू सूद बनला देवदूत; व्हिडिओ शेअर करत म्हणाला ‘ फक्त एक मेसेज…’

मुंबई: मध्यपूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे जगभरात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईसह अनेक देशांमध्ये विमानसेवा विस्कळीत झाल्याने हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. या संकटाच्या काळात दुबईमध्ये अडकलेल्या भारतीय आणि इतर देशांतील प्रवाशांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा पुढे सरसावला आहे.

सोनू सूद याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करत दुबईमध्ये अडकलेल्या लोकांसाठी मोफत निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याची माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, युद्धामुळे अनेक प्रवासी दुबईमध्ये अडकले आहेत आणि जर कोणाकडे राहण्याची व्यवस्था नसेल, तर त्यांच्यासाठी सुरक्षित निवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल. “कोणतीही राष्ट्रीयता नाही, कोणतीही अट नाही फक्त मानवता म्हणून हे मी करत आहे ,” असे सांगत त्याने गरजू लोकांना इंस्टाग्रामवर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनू सूद म्हणतो, “सध्याच्या परिस्थितीमुळे जे लोक दुबईमध्ये अडकले आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुमच्या राहण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. तुम्हाला मोफत निवास दिला जाईल. तुम्ही भारतीय असाल किंवा इतर कोणत्याही देशाचे नागरिक असाल, जर तुम्ही दुबईमध्ये अडकले असाल तर मला इंस्टाग्रामवर डायरेक्ट मेसेज करा. तुम्ही तुमच्या देशात परत जाईपर्यंत तुमच्या निवासाची व्यवस्था आम्ही करू.”

हेही वाचा: Nitish Kumar Resignation: बिहारमध्ये सत्तांतराचे वारे, नितीश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; आता दिल्लीच्या राजकारणात एन्ट्री

सोनू सूद याची ही पुढाकाराची कृती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुकास पात्र ठरली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या मानवतेला सलाम केला. एका युजरने लिहिले, “तुमची मानवता, त्याग आणि समर्पण यांना सलाम. तुम्ही खरे हिरो आहात.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, “तुमच्या दयाळूपणाला सलाम. कठीण काळात तुमच्यासारखी माणसेच मानवतेवरचा विश्वास टिकवून ठेवतात.”

या संकटाच्या काळात काही भारतीय कलाकारही दुबईमध्ये अडकले होते. अभिनेत्री ईशा गुप्ता आणि सोनल चौहान यांसारख्या काही बॉलिवूड कलाकारांना प्रवासातील अडचणींना सामोरे जावे लागले होते. मात्र आता त्या भारतात परतल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना काळात स्थलांतरित कामगारांना मदत करून देशभरात लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या सोनू सूदने पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श समोर ठेवला आहे. संकटकाळात कोणतीही अट न ठेवता मदतीचा हात पुढे करणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांच्या या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

हेही वाचा: Mumbai traffic advisory: भारत-इंग्लंड सेमीफायनलपूर्वी मुंबईत ‘ट्रॅफिक अलर्ट’! वानखेडेवर जाण्यासाठी पोलिसांनी दिली ‘ही’ नियमावली

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version