देशभरात भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना वंदे मातरम या राष्ट्रीयगीतावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जुंपली झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशाच्या संसदेत राष्ट्रगीत जन गण मन याप्रमाणेच वंदे मातरम या गाण्यालाही राष्ट्रीय गाण्याचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, आता वंदे मातरम गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
भाजप प्रवक्ते आर.पी.सिंह यांनी सोनिया गांधींवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेस मुख्यालयात आज स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवण्यात आला, त्यावेळी वंदे मातरम हे गाणंही गाण्यात आलं. मात्र, काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधींनी वंदे मातरम गाणं गाण्यापासून थांबवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान भाजपने सोनिया गांधींवर वंदे मातरम वरून केलेल्या टीकेनंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण समोर आले आहे. तो व्हिडिओ वंदे मातरम थांबवण्यासाठी नव्हताच असा दावा महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांना पायाचा त्रास असल्याने ते फार काळ उभे राहू शकत नाही. त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली नव्हती. त्यांना बसण्यासाठी खुर्ची द्यावी असे सोनिया गांधी सांगत असल्याचे काँग्रेसने सांगितले.
भाजपने ध चा म करून गोष्टी रचल्याचा पलटवार काँग्रेसने केला आहे. वंदे मातरम घोषणाच मुळची काँग्रेसची असून आरएसएस सारख्या तत्सम संस्थानचा वंदे मातरम या घोषणाशी कोणताही संबंध नसल्याचे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.