शरद पवारांचा मलिकांना पाठिंबा

शरद पवारांचा मलिकांना पाठिंबा

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच मलिकांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिकांना पाठिंबा दिला आहे.

  नवाब मलिकांकडून सुरू असलेल्या आरोपसत्राचे शरद पवार यांनी समर्थन केले आहे. त्यामुळे मलिकांनी उपस्थित केलेल्या आरोपांची दखल घेत केंद्र सरकारने संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. तसेच पवारांनी नवाब मलिकांना पाठिंबा दिल्यामुळे मलिक आता समीर वानखेडे आणि भाजप विरोधात आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  तसेच काल झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी सरकारविरोधात अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी त्यावर खिल्ली उडवत टीका केली आहे. भाजप पक्षाने मांडण्यात आलेल्या ठराव वाचून एक विनोद वाचला असल्याचा टोला शरद पवारांनी लगावला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मलिकांना पाठिंबा दिल्यामुळे आता याप्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version