शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार

शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मंगळवारी मनसेची उत्तरसभा पार पडली. या सभेदरम्यान, राज ठाकरे यांनी मविआवर निशाणा साधला असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीकेची झोड सोडली. यावर आता, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. जनतेनेच मनसेला उत्तर दिले असल्याचा टोला शरद पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

पवार कधीही आपल्या भाषणात शिवरायांचा उल्लेख करत नाही, असे राज ठाकरे सभेत म्हणाले होते. यावर पवार म्हणाले, माझ्यावर केलेला हा आरोप खोटा आहे. मी दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत भाषण करताना शिवरायांचा उल्लेख केला असल्याचे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. राज ठाकरेंनी सविस्तर वाचन केले असते तर असे बोलले नसते, असे म्हणत प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचण्याचा सल्ला पवारांनी राज ठाकरेंना दिला आहे.

राज ठाकरे आपल्या वक्तव्यातून राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच ते आपल्या भाषणात भाजपावर एकही शब्द बोलत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. एसटीच्या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांवर माझा रोष नाही, त्यांना चुकीचे नेतृत्व लाभलं आहे. गुणरत्न सदावर्तेंनी माझ्याबाबत द्वेष निर्माण केला, म्हणून सिल्वर ओक निवासस्थांनी हल्ला झाला असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांबाबत काय म्हणाले राज ठाकरे?  

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांनी कायम भूमिका बदलली आहे. तसेच पवारांच्या तोंडी कधीच शिवरायांचे नाव आले नाही, कारण शिवरायांचे नाव घेतले तर मुसलमान नेते नाराज होतील. त्यामुळे राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version