Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात; मक्का ते मदीना जाणारी बस टँकरवर आदळली, 42 भारतीयांचा मृत्यू

बसला आग लागल्याने मृतांची संख्या वाढली. हैदराबादमधील अनेक नागरिकांचा समावेश असून जेद्दा भारतीय दूतावासाने तातडीची हेल्पलाइन सुरु केली आहे.
Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात; मक्का ते मदीना जाणारी बस टँकरवर आदळली,  42 भारतीयांचा मृत्यू

सऊदी अरेबियात एक धडकी भरवणारा अपघात घडला असून या दुर्घटनेत 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये बहुसंख्य जण हे हैदराबाद येथील उमरा यात्रेकरू असल्याचे सांगितले जाते. मक्का ते मदीना जात असताना एका प्रवासी बसला बाजूने येणाऱ्या डिझेल टँकरने जोरदार धडक दिली. हा अपघात मुफरिहत परिसरात झाला असून धडकेनंतर बस पूर्णपणे चकनाचूर झाली आणि त्यातच बसला आग लागली.

अपघाताच्या वेळी बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत होते. अचानक टँकरची धडक बसला लागली आणि काही सेकंदांत परिस्थिती भीषण झाली. आग लागल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यासाठी सऊदीच्या रेस्क्यू टीम्स तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक प्रवासी गंभीर जखमी असल्याचीही माहिती मिळत आहे.

हेही वाचा: India – US Trade Deal: भारतासमोर अमेरिकेची माघार; दोन्ही देशातील व्यापार करार आता अंतिम टप्प्यात

सऊदी अरेबियातील या मोठ्या दुर्घटनेबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले. मक्का ते मदीना मार्गावर घडलेल्या या अपघातात हैदराबादमधील नागरिक सामील असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना सर्व तपशील गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.

या बसमधील सर्व भारतीय उमरा यात्रा पूर्ण करून मदीनाकडे जात होते. गर्दीचा आणि व्यस्त समजला जाणारा मक्का – मदीना हायवे हा उमरा आणि हज यात्रेकरूंसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. दरवर्षी हजारो भारतीय या रस्त्याने प्रवास करतात. घटनेनंतर जेद्दा येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने मदत आणि माहिती देण्यासाठी विशेष हेल्पलाइन नंबर जारी केला आहे, जेणेकरून पीडितांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळू शकेल.

हेही वाचा: Bridge Collapse : सर्वत्र पळापळ अन् घबराट… पूल कोसळून तब्बल 32 हून अनेक जणांनी गमावला जीव; गृहमंत्र्यांनी सांगितले…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version