चेन्नईतील चेपॉक मैदानावर रंगलेल्या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पाच विकेट्सनी पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 209 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. मात्र, पंजाबने आक्रमक आणि नियोजनबद्ध फलंदाजीच्या जोरावर 19व्या षटकातच हे आव्हान सहज पार केले.
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात भक्कम झाली. आयुष म्हात्रे याने 73 धावांची शानदार खेळी करत संघाला मजबूत पाया घालून दिला. सरफराज खान याने 32 धावांची जलद खेळी करत धावगती वाढवली, तर शिवम दुबे 45 धावांवर नाबाद राहिला. या तिघांच्या कामगिरीमुळे चेन्नईने 209 धावांचा स्पर्धात्मक स्कोअर उभारला.
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात धडाकेबाज झाली. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या दोघांनी अवघ्या 4.2 षटकांत 61 धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली. प्रियांशने फक्त 11 चेंडूत 39 धावांची तुफानी खेळी केली, तर प्रभसिमरनने 43 धावा केल्या. मात्र, तो दुर्दैवी पद्धतीने धावबाद झाला.
? to ? victories ✌️@PunjabKingsIPL complete the chase in an authoritative fashion ❤️ A win by 5⃣ wickets in Chennai ? Updates ▶️ https://t.co/riWrE2EZiF#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvPBKS pic.twitter.com/S9EEawsaZk — IndianPremierLeague (@IPL) April 3, 2026
हेही वाचा: Mumbai Gas Shortage: आखाती युद्धाचा गॅस पुरवठ्यावर परिणाम; मुंबईत वाढली चुलींची मागणी
यानंतर कूपर कॉनोलीने 22 चेंडूत 36 धावा करत डावाला वेग दिला. मात्र, खऱ्या अर्थाने सामन्याचे चित्र बदलले ते कर्णधार श्रेयस अय्यर याच्या फलंदाजीने. शेवटच्या 10 षटकांत 107 धावांची गरज असताना अय्यरने आक्रमक खेळ करत गोलंदाजांवर दबाव टाकला. त्याने 29 चेंडूत 50 धावा करत चार चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी केली आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
विशेष म्हणजे, चेन्नई सुपर किंग्जला महेंद्रसिंह धोनी याच्या अनुपस्थितीचा मोठा फटका बसला. दुखापतीमुळे धोनी या सामन्यातही खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत चेन्नईची कामगिरी खालावलेली दिसून आली आणि हा त्यांचा सलग दुसरा पराभव ठरला.
? ???????'? ?????? Relive #PBKS skipper @ShreyasIyer15's match-winning knock ?#TATAIPL | #KhelBindaas | #CSKvPBKS https://t.co/qyYpKzWkud — IndianPremierLeague (@IPL) April 3, 2026
यापूर्वी राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा 8 विकेट्सनी पराभव केला होता, तर आता पंजाबकडून 5 विकेट्सनी पराभूत झाल्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तळाशी पोहोचली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने सलग विजयांसह स्पर्धेत त्यांची दावेदारी अधिक भक्कम केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.