Narendra Modi : पंतप्रधान मोदींची जागतिक मोहोर! इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित

पंतप्रधान मोदींना एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. इथिओपियातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच ‘ग्रेट ऑनर निशान’हा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे.
Narendra Modi : पंतप्रधान मोदींची जागतिक मोहोर! इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. इथिओपियातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच ‘ग्रेट ऑनर निशान’हा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे. इथिओपियातील ‘ग्रेट ऑनर निशान’हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले जागतिक राष्ट्रप्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात केली, पहिला थांबा म्हणून ते जॉर्डनमध्ये पोहोचले. जॉर्डनचा दौरा पूर्ण केल्यानंतर ते इथिओपियात पोहोचले, जिथे पंतप्रधान अबी अहमद अली यांनी विमानतळावर त्यांचे स्वतः स्वागत केले आणि मिठी मारून त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा- Naxals Surrender: छत्तीसगडमध्ये माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश; 84 लाख रुपयांचे सामूहिक बक्षीस असलेल्या 34 माओवाद्यांचे आत्मसमर्पण

इथिओपियात पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रथम आदिस अबाबा येथील विज्ञान संग्रहालयाला भेट दिली, जिथे पंतप्रधान अबी अहमद देखील त्यांच्यासोबत होते.पंतप्रधान मोदी 16 ते 17 डिसेंबर 2025 दरम्यान इथिओपियाच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर असताना, इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद यांनी आदिस आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका विशेष समारंभात पंतप्रधान मोदींना हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराने सन्मानित करणारा इथिओपिया हा जगातील 25 वा देश आहे. भारताचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत अशातच भारत-इथियोपिया संबंध मजबूत करण्याच्या हेतूने आणि जागतिक मंचावर दूरदर्शी नेतृत्वासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा- IPL 2026 Auction: मॉडेलसारखा लूक आणि दमदार फिटनेस! IPL लिलावाआधी पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन चर्चेत

यावेळी पंतप्रधान मोदींनी कृतज्ञता व्यक्त करत ट्वीट करत म्हणाले की, “मला ‘इथियोपियाचा महान सन्मान निशाण’ म्हणून, या देशाचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. विश्वाची अति-प्राचीन आणि समृद्ध सभ्यता द्वारे ओळखली जाते, माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट आहे. त्यांनी हा सन्मान सर्व भारतीयांना आणि इथिओपियन लोकांना समर्पित केला ज्यांनी पिढ्यानपिढ्या दोन्ही देशांमधील संबंध मजबूत केले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की ते 1.4 अब्ज भारतीयांच्या वतीने कृतज्ञतेने हा सन्मान स्वीकारतात.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version