‘नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचे पोलिसांनी भान ठेवावे’ – प्रवीण दरेकर

‘नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचे पोलिसांनी भान ठेवावे’ – प्रवीण दरेकर

पोलिसांनी कारवाई करताना नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत याचे भान ठेवावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तसेच पोलीस महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत काम करत असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, नारायण राणे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे पोलिसांनी कारवाई करताना याचे ठेवावे. कायद्यासमोर सर्व समान आहेत, मात्र केंद्रीय आणि लोकप्रतिनिधी म्हणून विशेष अधिकार आहेत. त्यामुळे कारवाई करताना काही प्रक्रिया पार पाडावी लागते. सरकारकडून नारायण राणे यांच्यावर दबाव आणण्याची भूमिका मविआ सरकारने घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून नारायण राणे यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

नारायण राणेंना पोलिसांची नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांचा ठावठिकाणा कुठे आहे याबद्दल सांगणार नाही, नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version