PM Modi cabinet: कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांची ‘सोशल मीडिया टेस्ट’! डिजिटल रिपोर्ट कार्डमधून समोर आली कामगिरी; कोण ठरलं अव्वल, कोण पिछाडीवर?

बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे डिजिटल रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले. हे रिपोर्ट कार्ड 1 मे ते 15 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या कालावधीतील सोशल मीडिया आकडेवारी आणि माहितीवर आधारित आहे.
PM Modi cabinet: कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांची ‘सोशल मीडिया टेस्ट’! डिजिटल रिपोर्ट कार्डमधून समोर आली कामगिरी; कोण ठरलं अव्वल, कोण पिछाडीवर?

बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांचे डिजिटल रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले. हे रिपोर्ट कार्ड 1 मे ते 15 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या कालावधीतील सोशल मीडिया आकडेवारी आणि माहितीवर आधारित आहे. या यादीत फेसबुक, एक्स आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मसह लहान-मोठ्या सर्वच नेत्यांच्या कामगिरीचे परीक्षण केले आहे. तसेच मंत्र्यांच्या पोस्ट, लाईक्स आणि फॉलोअर्स यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात आता मंत्र्यांची डिजिटल कामगिरी तपासली जात आहे.

या डिजिटल आढाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. हा आढावा केवळ फॉलोअर्सपुरता मर्यादित नसून कोणता मंत्री डिजिटल जगात जनतेशी किती प्रभावीपणे जोडला जात आहे हे पाहण्यासाठी घेण्यात आला. मंत्र्यांकडून दररोज सरासरी किती पोस्ट केल्या जात आहेत आणि त्यावर नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे, याचा सखोल अभ्यास करण्यात आला.

हेही वाचा- Union Cabinet: मोदी सरकारचा मोठा निर्णय! 13 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; महामार्गासह रेल्वे नेटवर्कला मिळणार नवी गती

केवळ लाईक किंवा शेअर नव्हे, तर फॉलोअर्ससोबतचा थेट संवाद महत्त्वाचा मानला जाणार आहे. यावेळी दररोजच्या पोस्ट आणि सरासरी एंगेजमेंटचे मूल्यांकन करत सोशल मीडियावरील रीच आणि एंगेजमेंटच्या बाबतीत पंतप्रधान पहिल्या क्रमांकावर राहिले असून ज्या मंत्र्यांची डिजिटल कामगिरी कमी ठरली त्यांना कार्यपद्धती सुधारण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

या यादीत फेसबुक, एक्स आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मसह लहान-मोठ्या सर्वच नेत्यांच्या कामगिरीचे परीक्षण केले आहे. मंत्र्यांच्या पोस्ट, लाईक्स आणि फॉलोअर्स यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. केवळ पद धारण करणे पुरेसे नाही, हे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. मंत्र्यांनी जनतेशी थेट संवाद साधला पाहिजे. त्यांनी विशेषतः इन्स्टाग्रामवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. तरुणांना सहभागी करून घेतल्याशिवाय सोशल मीडियाचा खेळ जिंकता येणार नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version