भिवंडीत आढळली प्लास्टिकची अंडी

भिवंडीत आढळली प्लास्टिकची अंडी

काही महिन्यांपूर्वी बाजारात प्लास्टिकची अंडी आल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. हे प्रकरण मिटतच नाही इतक्यात पुन्हा एकदा प्लास्टिकची अंडी पाहायला मिळत आहेत.

या प्लास्टिकच्या अंड्यांचा अनुभव भिवंडीतील भाडवड सोनाळे हद्दीतील एका रहिवाशाला आला आहे.

अंडी खरेदी करताना रहिवाशाला प्लास्टिकची अंडी मिळाली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ तयार करून त्याने सोशल मीडियावर पसरवला.

यामुळे प्लास्टिकच्या अंड्याची माहिती भिवंडीकरांना मिळाली. या सर्व प्रकरणामुळे भिवंडीकरांच्या मनात प्लास्टिकच्या अंड्याबाबत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version