पाकिस्तान चक्रावला; लाहोर विमानतळाला आग कुणी लावली?

पाकिस्तानच्या गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली होती. माहितीनुसार, ही आग प्रचंड मोठी होती.
पाकिस्तान चक्रावला; लाहोर विमानतळाला आग कुणी लावली?

लाहोर: पाकिस्तानच्या गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली होती. माहितीनुसार, ही आग प्रचंड मोठी होती. आग लागल्यामुळे विमानाचे उड्डाण देखील रोखण्यात आले होते. सूत्रांनुसार, लाहोर विमानतळावर पाकिस्तानी सैन्याचं एक विमान उतरत असताना अचानक विमानाच्या टायरला आग लागली. शनिवारी, सकाळी 10 च्या सुमारास ही आग लागली होती. सुदैवाने, ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या विमानतळावर दाखल झाले. आग लागल्यामुळे, काही काळासाठी येथील रनवेदेखील बंद करण्यात आले होते. नेमकं कोणत्या कारणामुळे ही आग लागली असावी हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या आगीमुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: भारताने पाणी थांबवल्यास प्रत्युत्तर देऊ; पाकिस्तानचे पंतप्रधान शारबाज शरीफ यांचं वक्तव्य

या घटनेमुळे, प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. सुदैवाने, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही झाली. आग लागल्याच्या काही क्षणांतच विमानतळावर धुराचे लोट पसरले. आधीच, भारत – पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असल्यामुळे पाकिस्तानातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच, ही आग पाहिल्यानंतर तेथील नागरिक आणखी घाबरले. काही विपरित तर नाही घडलं ना? अशी शंका प्रवाशांमध्ये होऊ लागली. त्यामुळे, विमानतळावर प्रवाशांची धावपळ सुरू झाली. मात्र, ही आग विमानाच्या टायरला लागल्याचं कळल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version