‘मलिक, मर्द असाल तर…’ – अमृता फडणवीस

‘मलिक, मर्द असाल तर…’ – अमृता फडणवीस

  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे. तसेच जयदीप राणा या ड्रग्ज पेडलसोबतचे फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीसांचा जयदीप राणाशी काय संबंध? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. यावर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांवर हल्लाबोल केला आहे. ‘मर्द असाल तर देवेंद्रजींना टार्गेट करा’ अशी टीका अमृता फडणवीस यांनी मलिकांवर केली आहे.

  नवाब मलिक यांच्याकडून राजकरण सुरू असल्याची टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ‘मी राजकारणी नाही, मी समाजसेविका असल्याचे’ त्यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई रिव्हर संस्थेने मला संपर्क साधला होता. तसेच मुंबईतील अनेक एनजीओंनीदेखील माझ्यसोबत संपर्क साधला होता. मी त्यांना नद्यांबाबत माहिती दिली  होती. आणि मी नद्यांच्या संवर्धनासाठीच ‘रिव्हर साँग’ गायले होते. असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

  नदी संर्वधनासाठी मी जे गाणे गायले होते, त्या गाण्याला सुरुवातीपासूनच ट्रोल करण्यात आले होते. माझ्या अंगावर कोणी आले तर मी सोडणार नाही. महाराष्ट्रातील नद्यांना नालं बोलणे लज्जास्पद असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे रिव्हर गाण्यावरून मलिकांनी आरोप केल्यामुळे मर्द असाल तर देवेंद्रजींना टार्गेट करा असा हल्लाबोल अमृता फडणवीस यांनी केला आहे.

  तसेच अमृता फडणवीस यांनी ‘चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते.’ असे ट्विट करत मलिकांनी केलेल्या आरोपावर टीका केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version