श्रीहरिकोटा, १ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताची पहिली सौरमोहीम आदित्य L1 सुरू झाली आहे. या मोहिमेपूर्वी इसरोच्या शास्त्रज्ञांचे एक पथक आदित्य-L1 मिशनच्या मिनी मॉडेलसह तिरुमला येथील वेंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले होते.
भारताची पहिली सौर मोहीम आदित्य – L1 शनिवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावली.
आदित्य-L1 हा उपग्रह सूर्याच्या सर्वसमावेशक अभ्यासासाठी आहे. त्यात सात वेगळे पेलोड विकसित केले आहेत. हे सर्व स्वदेशी आहेत. पाच इसरोद्वारे आणि दोन भारतीय शैक्षणिक संस्थांनी इसरोच्या सहकार्याने तयार केले आहेत.
आदित्य म्हणजे सूर्य आणि L1 म्हणजे लग्रांज पॉईंट एक Lagrange Point 1. सोप्या भाषेत सांगायचे तर पृथ्वी आणि सूर्य या दोन्हीचे गुरुत्वीय बल आणि चुंबकीय क्षेत्र तसेच वातावरण ज्या ठिकाणी नाही अशी जागा. या ठिकाणी राहून आदित्य-L1 सूर्याचा अभ्यास करणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
१. सूर्य हा वायूचा एक विशाल गोलाकार
२. आदित्य-L1 पृथ्वीपासून अंदाजे दीड दशलक्ष किमी अंतरावर राहून सूर्याचा अभ्यास करणार
३. आदित्य-L1 सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करणार
४. आदित्य-L1 सूर्यावर उतरणार नाही किंवा सूर्याच्या जवळ जाणार नाही
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.