देगलूर पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी

देगलूर पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी

  देगलूर पोटनिवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले आहेत. जितेश अंतापूरकर यांना १,०८,८४० मते मिळाली आहेत. अंतापूरकर यांनी ४१,९३३ मतांनी विजय मिळवला आहे. तसेच भाजपच्या सुभाष साबणे यांना ६६, ८७२ मते मिळाली आहेत.

  ३० ऑक्टोबर रोजी देगलूर येथे मतदान पार पडले. आणि आज मतमोजणी झाली असून काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी बाजी मारली आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे दिवंगत आ.रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांनी उमेदवारी लढवली. तसेच भाजप पक्षाकडून सुभाष साबणे यांनी लढत दिली. आणि अखेर देगलूर पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांनी ४१,९३३ मंतांनी विजय मिळवला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version