रशिया-युक्रेनमधील युद्धाचा कायम आहे. तर अशा तणावग्रस्त परिस्थिमीमुळे अनेक भारतीय रहिवासी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्य जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, अशातच एक दुख:द बातमी समोर आली आहे. युक्रेनमधील खारकिव्हमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
युक्रेनमधील खारकिव्हमध्ये आज सकाळी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्टर मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. नवीन शेखराप्पा असे या विद्यार्थ्यांचे नाव असून ते कर्नाटकातील हा रहिवासी आहे. तसेच या घटनेची माहिती विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना देण्यात आली असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी रशिया आणि युक्रेनच्या राजदुतांशी संवाद साधला. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच युक्रेनच्या अनेक भागांमध्ये अनेक भारतीय अडकले असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
युक्रेनमधील खारकिव्हमध्ये सकाळच्या सुमारास क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले असून आगीचा भडका उडाला आहे. या भीषण हल्ल्यात मोठी हानी झाली असल्याची शक्यता आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.