Indian Cricket Team: भारताच्या खराब खेळावर कोहलीच्या भावाची कडवी प्रतिक्रिया; गभीरांच्या नेतृत्वावर उपस्तितीत केले प्रश्नचिन्ह

विकास कोहलीच्या उपरोधिक पोस्टने वाद पेटला आहे. भारत पराभवाच्या उंबरठ्यावर उभा असताना गंभीरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Indian Cricket Team: भारताच्या खराब खेळावर कोहलीच्या भावाची कडवी प्रतिक्रिया; गभीरांच्या नेतृत्वावर उपस्तितीत केले प्रश्नचिन्ह

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत टीम इंडिया अडचणीत सापडली असून, मालिकेत पराभवाचे सावट गडद झाले आहे. गुवाहाटीतील दुसऱ्या कसोटीतील खराब खेळामुळे भारतीय संघावर टीकांचा भडीमार सुरू आहे. संघाचा कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, तर टीम सिलेक्शनपासून रणनीतीपर्यंत सर्व गोष्टींवर टीका होत आहे.

या पार्श्वभूमीवर विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली याने केलेली एक उपरोधिक सोशल मीडिया पोस्ट मोठ्या चर्चेचा विषय ठरली. त्याने लिहले , "एकेकाळी आपण परदेशातही विजयासाठी खेळायचो, आता घरच्या मैदानावर सामना वाचवण्यासाठी झगडतोय. जेव्हा विनाकारण बदल केले जातात आणि व्यवस्थित चालणाऱ्या गोष्टींची वाट लावली जाते, तेव्हा असंच होतं. संघाने जिंकण्याची हिम्मत गमावली आहे" अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नंतर त्याने ती पोस्ट काढून टाकली, पण त्यापूर्वीच ती चाहत्यांमध्ये व्हायरल झाली.

हेही वाचा: Vande Bharat Train : 'वंदे भारत' प्रकल्पाचे जनक सुधांशू मणी यांनी सांगितला रेल्वे प्रवासाचा अनुभव; म्हणाले, 'प्रवासी संख्येमुळे….'

सध्या दुसरा कसोटी सामना निर्णायक टप्प्यात आहे. पहिल्या कसोटीत भारत 30 धावांनी पराभूत झाला होता. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात मोठी 288 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसाअखेर आफ्रिकेने दुसरा डाव 260/5 वर घोषित केला. विजयासाठी भारताला तब्बल 522 धावांची गरज आहे. जे जवळपास अशक्य वाटणारे लक्ष्य आहे. सामना ड्रॉ जरी झाला तरी मालिका 1-0 ने दक्षिण आफ्रिकेच्या खिशात जाणार. गंभीरसाठी ही परिस्थिती त्याच्या नावाप्रमाणेच अधिक गंभीर बनली आहे. भारताने ही मालिका 0-2 ने गमावली, तर घरच्या मैदानावर सलग दोन कसोटी मालिका हरवणारा तो भारतीय टेस्ट इतिहासातील पाहिला कोच ठरेल. त्याच्या कार्यकाळात भारताने मायदेशात चारपैकी दोन मालिका गमावल्या आहेत. एकूण 18 कसोटी सामन्यांत फक्त सात विजय मिळाले असून नऊ  वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे.

दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते असून भारताच्या जुन्या कमकुवत बाजूंना त्यांनी पुन्हा उघडे पाडले आहे. चाहत्यांमध्ये नाराजी वाढली असून अनेकांना विराट कोहलीच्या कॅप्टनशीप काळातील सुवर्णकाळाची आठवण येत आहे, ज्या काळात टीम इंडिया घरच्या मैदानावर अक्षरशः अजिंक्य होती. टीम इंडियाच्या पुढील खेळातून या संकटातून बाहेर पडण्याची चिन्हे दिसतात का, याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: CM Of Karnataka : कर्नाटकात सत्ता स्थापनेवरून तणाव; डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version