नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान युद्धाला अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करून युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र, काही वेळापूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील श्रीनगर येथे गोळीबार सुरू केल्याचे व्हिडिओ जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवरून दिले.
This is no ceasefire. The air defence units in the middle of Srinagar just opened up. pic.twitter.com/HjRh2V3iNW — Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
हेही वाचा: भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही; अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जे.डी.व्हान्स यांचं वक्तव्य
नेमकं प्रकरण काय?
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही वेळापूर्वी, श्रीनगर येथे अनेक ठिकाणी स्फोट झाले आहेत. नुकताच, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवरून माहिती दिली की, ‘युद्धबंदीचे काय झाले? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले!’. श्रीनगर येथे स्फोट झाल्यानंतर तातडीने ब्लॅकआउट घोषित करण्यात आला आहे. श्रीनगरसह बारामुल्लामध्येही ब्लॅकआउट जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान सध्या अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा येथे गोळीबार करत आहे. बारामुल्लामध्येही स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. येथे पाकिस्तानी ड्रोनही पाडण्यात आला आहे.
‘जम्मू-काश्मीरमध्ये युद्धबंदी नाही’, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. सध्या श्रीनगरच्या मध्यभागी हवाई संरक्षण युनिट सक्रिय करण्यात आले आहे.
What the hell just happened to the ceasefire? Explosions heard across Srinagar!!! — Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025
हेही वाचा: पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज का दिले? एमआयएमचे नेते ओवैसींचा सवाल
जम्मूच्या मोठ्या भागातही ब्लॅकआउट जाहीर:
जम्मूच्या मोठ्या भागातही ब्लॅकआउट जाहीर करण्यात आला आहे. पंजाबमधील पठाणकोट आणि गुरुदासपूरमध्येही वीजपुरवठा खंडित झाला आहे. श्रीनगरमध्ये बॉम्बस्फोट सुरूच आहेत. ड्रोनविरोधी यंत्रणा ड्रोनना लक्ष्य करत आहेत. श्रीनगरमधील लष्करी मुख्यालयाजवळ चार पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आले आहेत. एका अहवालानुसार, श्रीनगरमध्ये ड्रोनच्या हालचाली तीव्रतेने सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफला पाकिस्तानी शस्त्रसंधी उल्लंघनाला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.