संघ मुख्यालयाची पाहणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

संघ मुख्यालयाची पाहणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैश ए मोहम्मद संघटनेने रेकी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची पाहणी केल्याप्रकरणी नागपूरमध्ये युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नागपुरात जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याचा वावर असल्याचे उघड झाले आहे.

नागपूरमध्ये जैश ए मोहम्मद संघटनेच्या दहशतवाद्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलीस व्यवस्था कडक असल्याने दहशतवादी मुख्यालयाची रेकी करण्यात अपयशी ठरला. दरम्यान क्राईम ब्रँच आणि एटीएसचे अधिकाऱ्यांनी काश्मीरमध्ये जाऊन याची माहिती घेतली असता, आरएसएसच्या मुख्यालयाची रेकी करणारा जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागपूरमध्ये दहशतवाद्याविरोधात युएपीए कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी लवकरच संबंधित दहशतवाद्याला नागपूर पोलीस ठाण्यात कस्टडी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version