शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र न्युमोनियाच्या उपचारांदरम्यान वयाच्या शंभरीत त्यांची प्राणज्योत मालवली.

  महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पर्वती परिसरातल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. बाबासाहेबांच्या पार्थिवावर सकाळी साडेदहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  पद्मविभूषण शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज सकाळी ५.०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version