ओडिशातील कटक शहरातील SCB मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात आज दिनांक 16 मार्च 2026 रोजी सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील ट्रॉमा केअर इमर्जन्सी विभागातील ICU मध्ये अचानक आग भडकली. या घटनेमुळे रुग्णालयात दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी घबराट पसरली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी काही रुग्णांचा ICU मध्ये धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर काहींचा उपचारासाठी इतरत्र हलवताना मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या पाच रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर आली आहे. या दुर्घटनेत काही रुग्णालय कर्मचाऱ्यांनाही किरकोळ दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्यांची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. रुग्णालयाच्या अंतर्गत अग्निशमन विभागाने प्रथम प्रतिसाद दिला, त्यानंतर बाहेरून तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात आले, मात्र धूर आणि आगीच्या तीव्रतेमुळे ICU मधील अनेक रुग्णांना मोठा फटका बसला.
STORY | 10 died, 11 injured in major fire at SCB Medical College Hospital ICU in Cuttack: Odisha CM At least ten patients were killed after a major fire erupted in an ICU in Odisha government-run SCB Medical College and Hospital here in the wee hours of Monday, Chief Minister… pic.twitter.com/CoZBchPbvQ — Press Trust of India (@PTI_News) March 16, 2026
गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने ICU मधून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. काही रुग्णांना रुग्णालयाच्या न्यू मेडिसिन ICU विभागात हलवून उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य सचिव, कटकचे जिल्हाधिकारी आणि डीसीपी घटनास्थळी दाखल झाले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनीही रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी न्यू मेडिसिन इमारतीत जाऊन जखमी कुटुंबीयांची भेट घेतली.
Odisha CMO says, "CM Mohan Charan Majhi expressed deep grief over the tragic fire incident in the Trauma Care ICU of SCB Medical College and Hospital. The CM visited the incident site and reviewed the situation. Majhi ordered a judicial inquiry into the incident and directed… — ANI (@ANI) March 16, 2026
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या सरकारी रुग्णालयात घडलेल्या या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगीचे नेमके कारण काय होते आणि यात कोणतीही निष्काळजीपणा झाला का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.