Priyanka Gandhi Vs PM Narendra Modi : प्रियांका गांधींनी मोदींचे नेहरुंवरील आक्षेप फेटाळले म्हणाल्या, "जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान तेवढे दिवस नेहरु…"

सध्या संसदेत चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंडित नेहरू यांच्या योगदानासंदर्भात भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर थेट निशाणा साधला आहे.
Priyanka Gandhi Vs PM Narendra Modi : प्रियांका गांधींनी मोदींचे नेहरुंवरील आक्षेप फेटाळले म्हणाल्या, "जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान तेवढे दिवस नेहरु…"

सध्या संसदेत चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या भारताच्या राष्ट्रीय गीतावर चर्चा झाली. यादरम्यान कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंडित नेहरू यांच्या योगदानासंदर्भात भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर थेट निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय सुरक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी बाबरी मशीद आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले.

हेही वाचा- MPCB: मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वायु प्रदुषण न‍ियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदुषण न‍ियंत्रण मंडळाने 19 आरएमसी प्लान्ट केले बंद

यावर संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान प्रियांका गांधी गांधी यांनी रोखठोक भूमिका मांडली. प्रियांका गांधी म्हणाल्या की, "जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. पंडित नेहरुंच्या योगदानावर अनेक प्रश्न मांडण्यात आले. पण जर त्यांनी इखीची निर्मिती केली नसती, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? "  

हेही वाचा- Navjot Kaur Sidhu Suspended: मोठी बातमी! नवज्योत कौर सिद्धू काँग्रेस पक्षातून निलंबित; फक्त 'या' एका विधानामुळे करण्यात आली कारवाई

" वंदे मातरमवरील चर्चेच्या माध्यमातून देशाचे लक्ष खऱ्या मुख्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे, प्रदूषण आदी गंभीर मुख्यांवर चर्चा न करता सरकार छोटीशी चर्चा करून जनतेची दिशाभूल करत आहे. सरकारने एकदा नेहरुंवरही चर्चा करायला हवी. असं आव्हान केलं. तसेच पहिले पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि दुसरे म्हणजे इतिहासात ज्यांनी बलिदान दिले. त्यांच्यावर नवे आरोप लादण्याचा प्रयत्न, तसेच, हे सरकार भविष्याकडे पाहत नाही. खऱ्या समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करणे हाच त्यांचा उद्देश असतो. संसदेत सुरु असलेल्या चर्चेमागे ही दोन कारण असल्याचे प्रियांका गांधींनी सांगितलं आहे."

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version