पुण्यात सीएनजी पंप चालक संपावर

पुण्यात सीएनजी पंप चालक संपावर

सीएनजी गाड्या वापरणाऱ्यांना पुणेकरांना आज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण आज २७ जानेवारी रोजी पुण्यातील सीएनजी पंपचालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.

सीएनजी पंप चालकांचा हा संप अनिश्चित काळासाठी सुरू राहणार आहे. या संपामुळे सीएनजी वाहन चालकांना सीएनजी उपलब्ध होणार नाही. टोरंट कंपनीने नफ्याचे वाटप न केल्याने पंप चालकांनी संपाची घोषणा केली आहे. टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची देखील पंपचालकांची मागणी आहे. या वादाचा फटका ग्रामीण भागातील प्रवासी, रिक्षाचालक यांना बसणार आहे. मात्र पुणे शहरातील MNGL ची सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.सीएनजी

काय आहे कारण?

पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंप चालकांना गुजरात येथील टोरंट गॅस कंपनीकडून सीएनजी चा पुरवठा करण्यात येतो. या गॅस पुरवठ्यावरील कमिशन वाढवून देण्याची पंप चालकांची मागणी आहे. पुरवठ्यावरील कमिशन वाढवून देण्यासंबंधीचा करार २०२१ मध्येच झाला होता. मात्र अद्याप कमिशन वाढवून मिळत नसल्याचा सीएनजी चालकांचा आरोप आहे. पुण्यातील सीएनजी चालकांनी याआधीही तीन वेळा बंद पुकारला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर माघार घेण्यात आली होती. त्यावेळी टोरंट गॅस कंपनीकडून आश्वासन देण्यात आलं होतं. गुजरातच्या टोरंट गॅस पुरवठा कंपनीविरोधात पुण्यातील ग्रामीण भागातील सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. २७ जानेवारी रोजी पहाटेपासून ग्रामीण भागातील सीएनजी पंप बंद ठेवण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version