‘अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. दरम्यान, त्यांनी अर्थसंकल्प २०२२चे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प २०२२वर प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प युवा, शेतकरी, कामगारांसाठी फायदेशीर असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या अर्थसंकल्पामुले तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. तर या अर्थसंकल्पाचा विशेष कल हा गरिबांचे कल्याण करण्याकडे आहे. गरिब, गरजूंच्या अनेक सुखसोयींवर या अर्थसंकल्पामध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे.

अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. तसेच या अर्थसंकल्पनातून सर्वांनाच फायदा होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच अनेक लघू उद्योगांसाठी नवी संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे कौतुक केले आहे. तर आत्मनिर्भरतेकडे मोठे पाऊल पडणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version