Assam Crime: पत्नीचे डोके कापून फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाताना…

पोलीस कोठडीत असताना 8 सप्टेंबर रोजी वैद्यकीय तपासणीला नेताना आरोपीने प्रसारमाध्यमांसमोर दिलेले वक्तव्य अत्यंत संतापजनक होते.
Assam Crime: पत्नीचे डोके कापून फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांच्या गाडीतून घेऊन जाताना…

Ramanuj Goswami Wife Murder Guwahati: गुवाहाटीमधील बेलटोला येथील बशिष्ठपुर परिसरात घडलेल्या भीषण हत्याकांडातील आरोपी रामानुज गोस्वामी याने पोलिसांच्या ताब्यात असताना गाडीतून उडी मारून स्वतःला संपवले. सोमवारी (14 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी त्याला गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना हा प्रकार घडला. नरकासुर टेकडीजवळ पोहोचताच आरोपीने चालत्या पोलीस वाहनातून अचानक बाहेर उडी मारली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार होते.

अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या अन् डोके फ्रिजमध्ये लपवले
पेशाने कॅब ड्रायव्हर असलेल्या रामानुज आणि रिया तालुकदार यांचा विवाह गेल्या वर्षी 22 सप्टेंबर रोजी झाला होता. मात्र, 3 सप्टेंबरच्या सकाळी पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांवरून (Extra Marital Affair) दोघांमध्ये तीव्र वाद झाला. रागाच्या भरात रामानुजने क्रूरतेची सीमा ओलांडत पत्नीची हत्या केली आणि तिचे मस्तक धडावेगळे केले. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने तिचे कापलेले डोके घरातील फ्रिजमध्ये लपवून ठेवले होते. या भयानक घटनेनंतर 6 सप्टेंबरच्या रात्री त्याने स्वतःहून पोलिसांत आत्मसमर्पण (Surrender) केले. यानंतर पोलिसांनी फ्लॅटवर जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.

हेही वाचा – Fake Cancer Medicine Racket : कर्करोगाच्या बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश; 90 हून अधिक रुग्णालये तपासणीच्या फेऱ्यात, एकाला अटक

मीडियासमोर पश्चात्ताप नसल्याची कबुली अन् नव्या हत्येची धमकी
पोलीस कोठडीत असताना 8 सप्टेंबर रोजी वैद्यकीय तपासणीला नेताना आरोपीने प्रसारमाध्यमांसमोर दिलेले वक्तव्य अत्यंत संतापजनक होते. आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नसून आपण माफी मागणार नाही, असे तो बेधडकपणे म्हणाला होता. इतकेच नव्हे तर जेलमधून बाहेर आल्यावर पत्नीशी संबंधित असलेल्या व्यक्तीचीही हत्या करेन, अशी खुली धमकी त्याने दिली होती. आरोपी रामानुज हा ड्रग्जच्या आहारी गेला होता आणि गुवाहाटीतील एका व्यसनमुक्ती केंद्रात त्याच्यावर अनेकदा उपचारही झाले होते.

न्यायालयातील हजेरीपूर्वीच आरोपीच्या दुर्दैवी अंताने प्रकरणाचा शेवट
या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण आसाम आणि देश हादरला होता. आत्मसमर्पण केल्यापासून आरोपी पोलीस कोठडीत होता आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत होते. 14 सप्टेंबर रोजी त्याला न्यायालयात सादर केले जाणार होते, परंतु त्याआधीच चालत्या गाडीतून मारलेल्या उडीमुळे त्याचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण गुवाहाटी शहरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाकडून अपघाताच्या आणि सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पुढील कारवाई केली जात आहे.

हेही वाचा – Nerul Crime : दोनदा कार रिव्हर्स घेतली आणि अंगावर…; पार्किंगच्या क्षुल्लक वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला चिरडलं

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version