‘होते तितके सर्व पुरावे आधीच दिले’, परमबीर सिंग यांचे आयोगासमोर प्रतिज्ञापत्र

‘होते तितके सर्व पुरावे आधीच दिले’, परमबीर सिंग यांचे आयोगासमोर प्रतिज्ञापत्र

  वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीवसुली केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी अनिल देशमुखांना अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या विरोधात आणखी कोणताही पुरावा नसल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले आहे.

  परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आणि अखरे परमबीर सिंग यांनी चांदीवाल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख यांच्या विरोधात असलेल्या पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘होते तितके सर्व पुरावे आधीच दिले’ असल्याचे परमबीर सिंग यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी यापलीकडे कोणताही पुरावा देण्यास परमबीर सिंग यांनी नकार दिला आहे.

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. अनिल देशमुख यांची १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने कारवाई करत देशमुखांना अटक करण्यात आली. न्यायालयाने देशमुखांचा जामीन नाकारला असून त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र असे असतानाच परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयागापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version