अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

अनिल देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

  राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. अनिल देशमुख यांची १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने कारवाई करत देशमुखांना करण्यात आली. अनिल देशमुखांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने देशमुखांचा जामीन नाकारला असून त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

  वरिष्ठ वकील विक्रम चौधरी यांच्या सोबत ॲड. अनिकेत निकम यांच्यावतीने न्यायालयात युक्तीवाद लढवला गेला. मात्र न्यायालयाने देशमुखांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आणि ६ नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुखांना कोठडी सुनावण्यात आली आहे.

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले  होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आणि अखेर इतके दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात हजर झाले. आणि अखेर देशमुखांची कसून चौकशी सक्तवसुली संचालनालयाने देशमुखांना अटक केली आणि आज न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर न करता न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

  अशातच महाविकास आघाडीला दोन झटके लागले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोठडी सुनावण्यात आली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित मालमत्तेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version