Anand Mahindra Post : ‘एक दिवस असा येईल.. की, आपल्याला जगाशी तुलना करावी लागणार नाही!’; आनंद महिंद्रांची सिक्कीमच्या स्वच्छतेबद्दलची पोस्ट चर्चेत

आनंद महिंद्रा यांनी एका क्रिएटरची पोस्ट शेअर केली आणि सिक्कीम शहरातील स्वच्छतेचे कौतुक केले आहे. तसेच, देशातील सर्व शहरे स्वच्छ-सुंदर आणि टापटीप होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
Anand Mahindra Post : ‘एक दिवस असा येईल.. की, आपल्याला जगाशी तुलना करावी लागणार नाही!’; आनंद महिंद्रांची सिक्कीमच्या स्वच्छतेबद्दलची पोस्ट चर्चेत

Anand Mahindra Post : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सतत वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडत असतात. आता त्यांनी सिक्कीममधील शहरांमध्ये असलेल्या स्वच्छतेबद्दल आणि शिस्तीबद्दल ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यांनी ट्रॅव्हल क्रिएटर सत्यजीत दहिया यांनी पोस्ट केलेला एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात हा क्रिएटर सिक्कीमच्या शहरांमधील स्वच्छतेवर भाष्य करत आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर असंख्य युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सिक्कीम शिस्त आणि स्वच्छतेचे एक आदर्श
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सिक्कीमचे वर्णन शिस्त आणि स्वच्छतेचे एक आदर्श उदाहरण म्हणून केले आहे. ते म्हणतात, “सिक्कीम स्वच्छता आणि शिस्तीचे एक आदर्श आहे. मला आशा आहे की, एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याला कौतुक करण्यासाठी आपल्या शहरांची तुलना जगातील इतर शहरांशी करावी लागणार नाही!” हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी सिक्कीमच्या शांत आणि सुव्यवस्थित रस्त्यांवर प्रकाश टाकला. यापूर्वी देखील आनंद महिंद्रा यांनी सिक्कीमबद्दल पोस्ट केली होती. तेव्हा त्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते की, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धता असूनही सिक्कीम अद्याप एक प्रमुख पर्यटन स्थळ का बनले नाही.

हेही वाचा – Anand Mahindra: AI मुळे नाही, तर ‘या’ गोष्टीच्या कमतरतेमुळे जात आहेत लोकांच्या नोकऱ्या; आनंद महिंद्रांचा धक्कादायक खुलासा

ट्रॅव्हल क्रिएटरच्या व्हिडिओतील निरीक्षणे
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ट्रॅव्हल क्रिएटर सत्यजीत दहिया सिक्कीमच्या शांत रस्त्यांवरून चालताना आणि सभोवतालच्या वातावरणाचे निरीक्षण करताना दिसतो. तो लोकांना दाखवतो की वाहने कशा प्रकारे शिस्तबद्धपणे केवळ ठरवून दिलेल्या जागेवरच लावली आहेत. तसेच, त्याने परिसरातील शांतता, पार्किंग नियमांचे पालन, स्वच्छ रस्ते आणि रस्त्यावर चालकांचे शिस्तबद्ध वर्तन यावरही लक्ष वेधले. या ट्रॅव्हल क्रिएटरने गमतीने या रस्त्यांची तुलना जपानशी केली असली तरी, त्याने पुढे स्पष्ट केले की तो सिक्कीममध्ये आहे. व्हिडिओमध्ये स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेली आकर्षक भित्तिचित्रे (Murals) देखील दिसतात.

ट्रॅव्हल क्रिएटरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे, “स्वच्छता आणि शिस्त फक्त परदेशात असते” या प्रचलित युक्तिवादाला अनेकांनी खोडून काढले आहे. भारतातीलच एक राज्य शिस्त आणि स्वच्छतेचे किती उत्तम उदाहरण असू शकते, हे सिक्कीमने दाखवून दिले आहे.

हेही वाचा – SC on Whiskey Tetra Pack : पुरावा म्हणून कोर्टात नेला व्हिस्कीचा टेट्रापॅक! सर्वोच्च न्यायालयात सगळेच अवाक्, न्यायमूर्तींनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version