Cockroach Janata Party: अमेरिकेतून थेट दिल्लीकडे! अभिजीत दीपके ‘या’ तारखेला भारतात दाखल होणार; जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा

‘कॉकरोच जनता पार्टी’चा संस्थापक अभिजीत दीपके 6 जून रोजी दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहेत.
Cockroach Janata Party: अमेरिकेतून थेट दिल्लीकडे! अभिजीत दीपके ‘या’ तारखेला भारतात दाखल होणार; जंतर-मंतरवर आंदोलनाची घोषणा

अमेरिकेत राहणार आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेला ‘कॉकरोच जनता पार्टी’चा संस्थापक अभिजीत दीपकेने भारत दौऱ्याची घोषणा केली आहे. ६ जून रोजी अभिजित दिल्लीमध्ये दाखल होणार असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे ही घोषणा मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.

अभिजीत दीपकेने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत विद्यार्थ्यांच्या परीक्षा, निकाल आणि भरती प्रक्रियेमधील कथित गोंधळावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांत विविध स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक प्रक्रियांवरून निर्माण झालेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने जबाबदारी स्वीकारावी आणि शिक्षणमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अभिजितने केली आहे.

हेही वाचा: West Bengal Cabinet Expansion: बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; 35 नव्या चेहऱ्यांनी घेतली शपथ

व्हिडिओमध्ये दीपकेने समर्थकांना थेट दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 'भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवण्याची वेळ आली आहे,' असं तो म्हणाला. त्याने 6 जून रोजी दिल्ली विमानतळावर भेटण्याचेही आवाहन समर्थकांना केले आहे.

अभिजितच्या मते, परीक्षांमधील अनियमितता आणि विद्यार्थ्यांवरील वाढता ताण हा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासाठी अधिकृत परवानगी घेण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. आंदोलन शांततेत आणि कायद्याच्या चौकटीतच होणार असल्याचा दावा त्याने केला आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’ ही सोशल मीडियावर सुरू झालेली व्यंगात्मक चळवळ असून युवकांमध्ये तिची मोठी चर्चा आहे. काही महिन्यांतच या चळवळीला मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स मिळाले आहेत. अनेक तरुणांनी सोशल मीडियावर या मोहिमेला पाठिंबा दर्शवला असून विविध मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत.

हेही वाचा: Share Market Crash: महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; 'या' कारणांमुळे 1100 अंशांनी कोसळला सेन्सेक्स

अभिजीत दीपकेने या घोषणेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्याबद्दल त्याचे समर्थन केले आहे, तर काहींनी या आंदोलनामागील उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, त्याच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि आंदोलनाच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे.

शिक्षण क्षेत्रातील मुद्द्यांवरून देशभरात आधीच अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या माध्यमातून हा विषय पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 6 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या या आंदोलनाकडे विद्यार्थी, सोशल मीडिया युजर्स आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version