‘गोवेकरांना वर्षाकाठी ३ सिलेंडर मोफत’ – प्रमोद सावंत

‘गोवेकरांना वर्षाकाठी ३ सिलेंडर मोफत’ – प्रमोद सावंत

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. गोवेकरांना वर्षाकाठी ३ सिलेंडर मोफत मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.

गोव्यात भाजपाचा महागाईवर उतारा पाहण्यास मिळत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना गोवेकरांसाठी वर्षाकाठी ३ सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपाने निवडणुकीत केलेल्या आश्वासनाची या निमित्ताने पूर्तता होत आहे. सध्या गरिबांना १२ सिलेंडर वर्षाकाठी सवलतीच्या दरात दिले जातात. गोव्यात आता वर्षाकाठी ३ सिलेंडर गरीब गोवेकरांना मोफत मिळणार आहे.

प्रमोद सावंत गोव्याचे १४वे मुख्यमंत्री

प्रमोद सावंत यांनी गोव्याचे १४वे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे देशभरातील ७ राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते. सावंत यांच्या मंत्रीमंडळात ८ मंत्री आहेत. या शपथविधीसाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आलेली होती. गोव्यात स्थापन झालेल्या भाजपा सरकारला मगोपच्या २ आणि ३ अपेक्षा आमदारांचा पाठिंबा आहे. एकत्रितरित्या २५ आमदारांच्या समर्थनासह गोव्यात तिसऱ्यांदा सलग भाजपाची सत्ता स्थापन होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version