गडचिरोलीत चकमकीत २६ नक्षलवादी ठार

गडचिरोलीत चकमकीत २६ नक्षलवादी ठार

  गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे.

  गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जंगल परिसरात आज सकाळच्य सुमारास पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. नक्षलवादी आणि महाराष्ट्र पोलिसांच्या चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे. दरम्यान काही मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहे. तर अजूनही पोलिसांचे ऑपरेशन सुरू असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version