उमेदवारी अर्ज भरण्याआधी हेमा मालिनींचे यमुना वंदन

उमेदवारी अर्ज भरण्याआधी हेमा मालिनींचे यमुना वंदन

मथुरा, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : भाजपाच्या मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार हेमा मालिनी गुरुवार ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी ३ एप्रिल रोजी हेमा मालिनी यांनी यमुना नदीची पूजा केली. खासदार झाल्यावर यमुना नदी स्वच्छ करण्याच्या मोहिमेला गती देणार असल्याचे हेमा मालिनी यांनी सांगितले.

हेमा मालिनी या भाजपाकडून २०१४ आणि २०१९ मध्ये मथुरेतून लोकसभेची निवडणूक जिंकल्या आहेत. त्यांना यावेळी हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version