मोदी विरोधकांचा नेता ठरेना !

मोदी विरोधकांचा नेता ठरेना !

नवी दिल्ली, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मोदी विरोधी गटाची दिल्लीत तीन तास बैठक झाली. या बैठकीत विरोधकांचा चेहरा म्हणून कोणत्या नेत्याची निवड करावी यावर चर्चा झाली. पण एकमत झाले नाही. अखेर कोणताही निर्णय न घेता बैठक संपवण्यात आली. लवकरच निवडणूक रिंगणात उतरू आणि केंद्र सरकार विरोधात लढू असे मोदी विरोधी गटातील सर्व नेत्यांनी सांगितले. तिकीट वाटपाच्या मुद्यावर लवकरच बैठक होईल, असे संकेत त्यांनी दिले. याआधी बैठक सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव या दोघांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव मोदी विरोधी गटाचे नेते म्हणून सुचवण्याचा प्रयत्न केला. खर्गे पंतप्रधान झाले तर देशाला पहिला दलित पंतप्रधान मिळेल असाही मुद्दा ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी मांडला. पण या मुद्यावर एकमत झाले नाही. खर्गे यांनी ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांची सूचना फेटाळली. जनता दल संयुक्त पक्षाकडून दलित चेहरा म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव सुचवण्याचा प्रयत्न झाला. अखेर कोणताही निर्णय न घेता बैठक संपवण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version