Mumbai Local Train: लोकल प्रवाशांना मोठा फटका; मंगळवार-बुधवारी 215 फेऱ्या रद्द, पाहा काय आहे नेमकी वेळ?

या ब्लॉकमुळे दोन दिवसांत 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या उशिराने धावणार आहेत. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था पाहण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.
Mumbai Local Train: लोकल प्रवाशांना मोठा फटका; मंगळवार-बुधवारी 215 फेऱ्या रद्द, पाहा काय आहे नेमकी वेळ?

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका जलद मार्गाला जोडण्यासाठी आज, मंगळवारी मध्यरात्रीपासून विशेष 'ब्लॉक' घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस मिळून एकूण 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, मुंबईकरांच्या प्रवासावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सहाव्या मार्गिकेच्या उभारणीसाठी रेल्वे प्रशासनाने 21 डिसेंबर 2025 पासूनच कामाला सुरुवात केली आहे. मात्र, आज मध्यरात्रीपासून होणारे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. अप जलद मार्गावर मध्यरात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत, तर डाउन जलद मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात पाचव्या मार्गिकेवरील वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवली जाणार असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Angaraki Sankashti Chaturthi 2026 : अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दुर्मिळ योग! राहु काळ, चंद्रोदय वेळ आणि पूजन विधी जाणून घ्या

या ब्लॉकमुळे मंगळवारी 93 लोकल फेऱ्या रद्द राहतील, तर बुधवारी रद्द फेऱ्यांचा आकडा 122 वर पोहोचणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये केवळ सामान्य लोकलच नव्हे, तर 15 डब्यांच्या लोकल आणि एसी (AC) लोकलचाही समावेश आहे. यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांची आणि सकाळच्या सत्रातील प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. काही लोकल फेऱ्या रद्द असल्या तरी, सुरू असलेल्या लोकल 10 ते 15 मिनिटे विलंबाने धावण्याची शक्यता आहे.

रेल्वेच्या या मेगाब्लॉकचा उद्देश प्रवाशांचा पुढील प्रवास अधिक सुखकर करणे हा आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे भविष्यात लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात अधिक सुसूत्रता येईल. मात्र, 18 जानेवारी 2026 पर्यंत या प्रकल्पाचे विविध टप्पे सुरू राहणार असल्याने प्रवाशांना पुढील काही दिवस संयम ठेवावा लागणार आहे.

प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत ॲपवर किंवा स्थानकावरील सूचना फलकावर आपल्या गाडीची माहिती तपासून घ्यावी. शक्य असल्यास पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करावा. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. 

हेही वाचा: Railway Fine: रेल्वेने वसूल केला 155 कोटींचा दंड, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version