परभणीमध्ये जिल्हा परिषदेच्या निधी वाटपावरून राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. परभणीत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनीच पालकमंत्री नवाब मलिक यांच्यावर मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याचा आरोप केला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ३० सदस्यांनी नवाब मलिकांविरोधात शड्डू ठोकला आहे.
परभणीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपसोबत नवाब मलिकांच्या कार्यपद्धतीविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ३० जिल्हापरिषद सदस्यांनी नवाब मलिकांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मलिकांनी नियमबाह्य पद्धतीने १० कोटींचा निधी लाटल्याचा आरोपही जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.