India EFTA Free Trade Agreement 2025: युरोपमधील 4 देशांसोबत मोठा करार, भारतात तब्बल 9 लाख कोटींची गुंतवणूक; ‘या’ वस्तूंच्या किंमती होणार कमी

भारत आणि युरोपातील चार विकसित देशांचा गट ईएफटीए यांच्यातील मुक्त व्यापार करार बुधवारपासून लागू झाला आहे.
India EFTA Free Trade Agreement 2025: युरोपमधील 4 देशांसोबत मोठा करार, भारतात तब्बल 9 लाख कोटींची गुंतवणूक; ‘या’ वस्तूंच्या किंमती होणार कमी

नवी दिल्ली: भारत आणि युरोपातील चार विकसित देशांचा गट ईएफटीए (स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलॅंड आणि लिकटेंस्टाईन) यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) बुधवारपासून लागू झाला आहे. यामुळे, भारत आणि युरोप संबंधांना नवा वेग मिळणार असून गुंतवणूक, रोजगार, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. 

या करारानुसार, पुढील 15 वर्षांत तब्बल 100 अब्ज डॉलर्स (सुमारे 8.86 लाख कोटी रुपये) गुंतवणूक होईल आणि सुमारे 10 लाख नवीन रोजगार निर्माण होतील. हा मुक्त व्यापार करार, भारतासाठी ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. 

भारतात स्वस्त होणारी उत्पादने खालीलप्रमाणे आहेत

स्विस वाइन, चॉकलेट, कपडे, बिस्किटे, द्राक्षे, सुकामेवा, भाज्या, कॉफी आणि स्विस घड्याळे आता भारतीय बाजारात स्वस्त किंमतीत मिळतील. 

भारतीय उत्पादनांची मागणी वाढेल

तांदूळ, डाळी, आंबा-द्राक्षे यांसारखी फळे, चहा, कॉफी, सीफूड, खेळणी आणि अभियांत्रिकी वस्तूंना युरोपियन बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण होईल. याचा थेट फायदा शेतकरी, लघु उद्योग, आणि निर्यातदारांना होईल.

हेही वाचा: US Tariff Impact on Indian Economy: अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धोका; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली चिंता

तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात फायदे

अक्षय उर्जा, वैद्यकीय संशोधन आणि स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्सारखे युरोपियन तंत्रज्ञान भारतात उपलब्द होईल. तसेच, नर्सिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, आर्किटेक्चर, शिक्षण, आयटी, ऑडिओव्हिज्युअल सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना नवे मार्ग खुलतील. 

मनोरंजन क्षेत्रात संधी

बॉलिबूड, भारतीय ओटीटी, संगीत आणि गेमिंग कंपन्यांसाठी युरोपियन बाजारपेठ सुरू होणार आहे. त्यामुळे, भारतीय सर्जनशील उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार होईल. 

'या' क्षेत्रात होणार फायदा

या कराराचा मोठा फायदा भारतातील अभियांत्रिकी वस्तू, रसायने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, प्लास्टिक उद्योगाला होणार आहे. तसेच, सोन्यावरील आयात मात्र बदलणार नाही. कारण, ईएफटीए देशांतून सोन्याची सर्वाधिक आयात होते. आतापर्यंत भारताने 16/ब्लॉकसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. या यादीत श्रीलंका, सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया, यूके सारख्या देशांचा समावेश आहे. ईएफटीए करारामुळे, भारताचा युरोपशी पहिला मोठा मुक्त व्यापार करार यशस्वी झाला आहे. यासह, रोजगार, गुंतवणूक, व्यापार आणि तांत्रिक प्रगतीच्या बाबतीत हा करार भारतासाछी एक सुवर्णसंधी असेल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version