Maharashtra Rain Alert : सावधान! हवामान खात्याचा इशारा; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मागील काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. यामुळे, जनजीवन विस्खळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Maharashtra Rain Alert : सावधान!  हवामान खात्याचा इशारा; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. यामुळे, जनजीवन विस्खळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई, बीड, पुणे, धाराशिव तसेच काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की, या आठवड्यात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. सोबतच, 26 सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे, मराठवाड्यातील शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हेही वाचा: Solapur Heavy Rain: मुसळधार पावसामुळे सोलापुरात गंभीर पूरस्थिती, 26 गावांचा संपर्क तुटला; प्रशासन अॅक्शन मोडवर

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात येलो अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ’23 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नगिरी, पुणे, कोल्हापूर, आदी. जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, 24 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर, पुणे, नाशिक, आदी. जिल्ह्यात विजांच्या गडगटांसह हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आली आहे’. 

डॉ. एस. डी. सानप यांची प्रतिक्रिया

हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी माहिती दिली की, ‘बंगालमधील उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यात कमी ते मध्यम स्वरुपात पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 23 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे’. 

सोबतच, हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘राज्यातील काही दिवसांत मुसळधार पाऊस होणार आहे. अशातच, नवरात्रोत्सव सुरू असल्याने सायंकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी सतर्क राहावे’. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version