राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मंगळवारी शिट्टी वाजेल – संजय राऊत

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मंगळवारी शिट्टी वाजेल – संजय राऊत

राज्यसभेच्या सहाव्या जागेची उद्या शिट्टी वाजेल, आम्ही निरोपाची वाट बघत नाही. राज्यसभेच्या २ जागा शिवसेना लढणार असून जिंकणार असल्याचं व्यक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांन राज्यसभेसाठी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेतून राज्यसभेसाठी निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात येईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

तसेच, शिवसेना कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नसून राज्यसभेसाठी दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच असणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

दरम्यान, मंगळवारी संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईसाठी रवाना झाले आहेत. तर, मुख्यमंत्र्यांना छत्रपतींच्या घराण्याचा मान आहे, म्हणून उमदेवारी देण्यात आली असल्याचा प्रस्ताव देण्यात आला असल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांच्या ताज्या प्रतिक्रियेवर आज राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मंगळवारी शिट्टी वाजेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version