Thalapathy Vijay: थलापतीला पाहताच चाहत्यांची त्याच्याकडे धाव; गर्दी एवढी वाढली की अभिनेत्याचा तोल गेला आणि… पाहा Video

मलेशियाहून परतताना चेन्नई विमानतळावर अभिनेता विजय गर्दीमुळे पडला.
Thalapathy Vijay: थलापतीला पाहताच चाहत्यांची त्याच्याकडे धाव; गर्दी एवढी वाढली की अभिनेत्याचा तोल गेला आणि… पाहा Video

Thalapathy Vijay: तमिळनाडू विजय कळघटम (TVK) पक्षाचे प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेता विजय रविवारी रात्री चेन्नई विमानतळावर चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत क्षणभर अडचणीत सापडले. मलेशियाहून परतताना विमानतळाच्या बाहेर पडताना कारकडे जात असताना गर्दीचा वेग अचानक वाढला आणि त्याच गडबडीत विजय तोल जाऊन खाली पडले. काही क्षणांतच सुरक्षारक्षकांनी त्यांना उचलून सुरक्षितपणे वाहनात बसवले. घटनेनंतर विजय ठीक असल्याचं सांगण्यात आलं.

मलेशियातील कुआलालंपूर येथे ‘जना नायकन’ या चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमासाठी गेलेले विजय रविवारी रात्री भारतात परतले. त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच चेन्नई विमानतळावर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले होते. विमानतळ परिसरात चाहत्यांची गर्दी उसळली असताना, विजय कारमध्ये बसण्याच्या काही क्षण आधी अडखळले. दृश्यांमध्ये कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचं दिसून आलं नाही. दरम्यान, विजय यांच्या ताफ्यातील एका वाहनाला किरकोळ धक्का बसल्याच्याही बातम्या काही वाहिन्यांवर दाखवण्यात आल्या; मात्र अधिकृत यंत्रणांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा:Dhurandhar box office: 23 दिवसांनंतरही ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफिसवर कहर; सिनेमाने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

या दौऱ्यात विजय यांनी केलेली घोषणा मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ‘जना नायकन’च्या ऑडिओ लॉन्चवेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. चाहत्यांसाठी आणि त्यांच्या अपेक्षांसाठी आपण पूर्णवेळ सार्वजनिक आयुष्यात उतरू इच्छित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “मी सिनेमात आलो तेव्हा छोटंसं घर बांधतोय असं वाटलं होतं; पण चाहत्यांनी मला किल्लाच उभारून दिला,” असं सांगत त्यांनी आपल्या प्रवासाचा भावनिक उल्लेख केला.

विजय म्हणाले की, चाहत्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी आणि त्यांनी दिलेल्या प्रेमासाठी आपण सिनेमाला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. “ज्यांनी माझ्यासाठी सर्वकाही दिलं, त्यांच्यासाठी मी सिनेमाच सोडतो,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा:Thalapathy Vijay Retirement: धक्कादायक! थलापती विजयचा चित्रपटसृष्टीला कायमचा 'रामराम'; 33 वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीनंतर आता निवडले 'हे' क्षेत्र

कुआलालंपूरमधील बुकित जलील स्टेडियममध्ये २७ डिसेंबर रोजी झालेल्या ऑडिओ लॉन्चला जवळपास एक लाख चाहते उपस्थित होते. इतक्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे हा कार्यक्रम मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेल्याची माहिती आहे. श्रीलंकेनंतर जगातील सर्वाधिक तमिळ भाषिकांची वस्ती असलेल्या मलेशियात विजय यांच्या लोकप्रियतेचा हा मोठा पुरावा मानला जात आहे.

एकीकडे चेन्नई विमानतळावरील किरकोळ घटनेमुळे क्षणभर चिंता निर्माण झाली, तर दुसरीकडे विजय यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिनेमाचा पडदा मागे टाकून जनसेवेच्या मैदानात उतरण्याचा त्यांचा निर्णय तमिळनाडूच्या राजकारणात नवी समीकरणं घडवू शकतो, अशी चर्चा सध्या रंगत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version