मुंबई : नालासोपारा (पूर्व) येथील राहत्या घरी टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिचा मृत्यू झाल्यानंतर, तिचा भाऊ आकाश सतीश उगले याने कास्टिंग एजंट्सवर गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आकाशने आरोप केला की, कास्टिंग क्षेत्राशी संबंधित लोकांकडून 30 वर्षीय संचिताचा मानसिक छळ केला जात होता. तसेच, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा संदर्भ देणारी आणि संचिताचा प्रोफाईल फोटो असलेली एक ‘इन्स्टाग्राम रील’ त्याला आढळली. ज्यामुळे तो घाबरला होता, असेही त्याने सांगितले.
तो म्हणाला, “मी तुम्हाला जी इन्स्टाग्राम आयडी आता दाखवली, त्यावर काल ही ‘रील’ (reel) अपलोड करण्यात आली होती. त्यात सुशांत सिंग राजपूतचा व्हिडिओ असून माझ्या बहिणीचा ‘प्रोफाइल फोटो’ वापरण्यात आला होता. मी तिच्या काही मैत्रिणींशी बोललो आणि मला समजले की काही कास्टिंगशी संबंधित लोक तिला त्रास देत होते. तिला मानसिक त्रास दिला जात होता आणि ती अस्वस्थ होती.” योगायोग म्हणजे संचिता आणि सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची तारीख एकच म्हणजे 14 जून ही आहे.
14 जून 2020 रोजी सुशांत वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला. नंतरच्या तपासात त्याचा मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. आकाश पुढे म्हणाला की, “सुशांत सिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी आत्महत्या केली. का? कारण बॉलीवूड या चित्रपटसृष्टीने त्याच्यावर प्रचंड दडपण आणले होते. त्याच दडपणामुळे त्याने आत्महत्या केली. अगदी त्याचप्रमाणे, काल माझ्या बहिणीनेही त्याच कारणास्तव आत्महत्या केली.” ते पुढे म्हणाले, “हे क्षेत्र अत्यंत भीतीदायक असू शकते. हे क्षेत्र लोकांना भयभीत करते किंवा त्यांचा बळी घेते. जसे सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत घडले. या क्षेत्राचा त्याच्यावर असा काही प्रभाव पडला की, त्याने त्याला आतून पूर्णपणे पोकळ करून टाकले. या सर्व गोष्टींमध्ये अनेकदा प्रभावशाली लोकांचा सहभाग असतो. शेवटी, हा सत्तेचा खेळ आहे.” त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
#WATCH | Nalasopara, Maharashtra: Akash Ugale, brother of actress Sanchita Ugale, says, "…Sushant Singh Rajput committed suicide on June 14, 2020. My sister also committed suicide on the same day. The Instagram ID I just showed you uploaded this reel yesterday, and it has a… pic.twitter.com/CjXvlYOEu4 — ANI (@ANI) June 15, 2026
दरम्यान, संचिता उगलेच्या सहकलाकारांनी आज तिच्या कुटुंबाची भेट घेतली. संचिताने टोकाचे पाऊल उचललं असून आपल्या परिवाराचा विचार करायला हवा होता, असे त्यांनी यावेळी म्हटले. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सहकलाकारांकडून संचिताला टॉर्चर होत असल्याचे संचिताच्या मावशीने सांगितले आहे. दुसऱ्या कोणत्या मुलीसोबत असे घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य तो तपास करावा, असे संचिताची मावशी म्हणाली. तिच्या मनामध्ये काहीतरी चाललं होतं. काम मिळत नसल्याने मात्र गेले काही दिवस ती कामाच्या जाचाला कंटाळून घरीच राहत होती. पण तिने आम्हाला कधी काही सांगितले नाही, असे संचिताचे वडील यांचे म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.