कुंभमेळ्यात आज दुसरे शाही स्नान

कुंभमेळ्यात आज दुसरे शाही स्नान

हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात आज दुसरे शाही स्नान होत आहे. या शाही स्नानासाठी अनेक साधू-संत हजेरी लावल्याचं दिसून आलं. यावेळी कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कुंभमेळ्यात अनेक साधूही कोरोनाबाधित आढळून आले आहेत. असे असतानाही उत्तराखंड पोलीस कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यात अक्षम दिसत आहे. येथे 50 हजार लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.

अनेक साधू पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखीही चाचण्या करण्यात येत आहेत. कुंभमेळ्यात मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघन झाल्याचं दिसतंय. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. कुंभमेळ्याचे आयोजक संजय गुंज्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाही स्नानासाठी सर्वात आधी अखाड्यांना परवानगी देण्यात आली. यानंतर 7 वाजल्यापासून सामान्य जनतेला स्नानाची परवानगी देण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version