क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणी समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ट्विटरच्या माध्यमातून वानखेडेंवर सतत आरोप करत आहेत तर प्रभाकर साईल, ऍड. सुदा द्विवेदी, ऍड कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र समीर वानखेडे यांनी ‘एसआयटी’ला आव्हान दिले आहे.
समीर वानखेडेविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या एसआयटीला वानखेडेंनी आव्हान दिले आहे. वानखेडेविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मिलिंद खेतले (सहाय्यक पोलीस आयुक्त) यांची मुंबईतील आझाद मैदान विभागात चौकशी करण्यासाठी नेमणुक करण्यात आली आहे. अजय सावंत (पोलीस निरीक्षक) यांची मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी नेमणुक करण्यात आली आहे. श्रीकांत कारकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांची मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी कक्षाची चौकशी करण्यासाठी नेमणुक करण्यात आली आहे. तर प्रकाश गवळी (पोलीस उप निरीक्षक) यांची मुंबईतील दक्षिण प्रादेशिक, सायबर पोलीस ठाण्याची चौकशी करण्यासाठी नेमणूक केली आहे.
तसेच दिलीप सावंत, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई हे पर्यवेक्षक अधिकारी आणि हेमराजसिंग राजपूत, पोलीस उप आयुक्त, कोळे कल्याण हे सहाय्यक पर्यवेक्षक अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.