मराठा आरक्षणप्रकरणी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत आहे.गुरुवारी संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.त्यानंतर शुक्रवारी संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. दरम्यान संभाजीराजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी दाखल झाले.त्यानंतर दुपारी ३ वाजता संभाजीराजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली.
‘फडणवीस यांना समाजाच्या मनातील राग बोलून दाखवला. विनंती केली की माझं तुझं न करता आपण एकत्र येवू या,जर उद्या वाईट परिस्थिती झाली तर त्यासाठी आम्ही तुम्ही सर्व नेते जबाबदार असू, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येवू या अशी हात जोडून बविनंती केली’ असं संभाजीराजे म्हणाले.
त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे मागण्या केल्या आहेत. या मागण्या ६ जूनपर्यंत मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.
काय आहेत मागण्या?
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.