‘रश्मी ठाकरेंनी १९ बंगल्यांचा कर भरला’ – किरीट सोमय्या

‘रश्मी ठाकरेंनी १९ बंगल्यांचा कर भरला’ – किरीट सोमय्या

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांच्याशी निगडित कागदपत्र सादर करून खुलासा केला आहे. तसेच रश्मी ठाकरे यांनी अलिबागमधील १९ बंगल्यांचा कर भरला असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबीयांचे बंगले नसतील तर संजय राऊत यांनी मी माझे जोडे दोते. त्यांनी या जोड्यांनी मला मारावे, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. तसेच कोविड घोटाळ्यामुळे ठाकरे कुटुंब आणि संजय राऊत घाबरले असून हा मुद्दा भरकटवण्यासाठी असे आरोप केले जात आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

अलिबागमधील बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे यांच्या नावे कर भरण्यात आले असल्याचे सोमय्या म्हणाले. त्यामुळे जर हे बंगले ठाकरेंशी संबंधित नव्हेत तर रश्मी ठाकरेंनी मालमत्ता कर का भरला? असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच रश्मी ठाकरे यांच्यासोबत मनिषा वायकर यांनीही कर भरला असल्याचे सोमय्या म्हणाले.

तसेच ते म्हणाले, अन्वय नाईकने २००८मध्ये बंगले बांधले आत. तर २००९पासून १९ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे आणि वायकर यांनी भरला. मागील वर्षापर्यंत ते कर भरत होते. त्यामुळे जर बंगले त्यांच्या नावी नाही तर त्यांनी कर का भरला, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version