युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंडची मदत

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंडची मदत

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय रहिवाश्यांना पोलंडकडून मदतीचा हात पुढे सरसावला आहे. पोलंडने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. तसेच अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी विनाव्हिसा प्रवेश देण्याची परवानगी पोलंडने दिली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंडने मदत केली असून भारतात येण्याची व्यवस्था होईपर्यंत भारतीय विद्यार्थी पोलंडनेमध्ये आश्रय घेऊ शकतात. तसेच पोलंडने अडकलेल्या भारतीयांसाठी अन्न, निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

काय आहे पोलंडची मदत?

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंडची मदत.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी निवारा.

युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी अन्न, निवाऱ्याची व्यवस्था.

भारतासाठी उड्डाणे आयोजित होईपर्यंत पोलंडमध्ये राहतील.

भारतात येण्याची व्यवस्था होईपर्यंत आश्रय घेवू शकतात.

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. स्थानिक नागरिकांना प्रवेश देत पोलंडच्या सीमारेषेवर अडवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना लाथा, बुक्क्यांनी मारहाणही करण्यात आली. तर भारतीय स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना स्थानिक पोलिसांकडून लाठीमार करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version